म. टा. प्रतिनिधी, नगर: वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्या उपस्थितीत झालेल्या ऊस तोडणी कामगारांच्या मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारींच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे दसऱ्यानिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

ऊसतोड कामगार संघटनेचे दादासाहेब खेडकर, शिवराज बांगर, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे, अरुण जाधव, अनिल जाधव, अमित भूईगल, संदीप शिरसाठ यांच्यासह इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने खरवंडी येथे ऊसतोडणी कामगार संघटना, मुकादम, वाहतूकदार यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर हे देखील आले होते. मात्र, आता या मेळाव्याच्या आयोजकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जमावबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होऊन मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती झाली असल्याचे देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मेळाव्याच्या आयोजकांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here