नागपूर: मुख्यमंत्री व पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणारे ट्वीट्स करणाऱ्या समीत ठक्करला नागपूर पोलिसांनी राजकोट येथून अटक केली आहे. सोमवारी त्याला नागपुरात न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ज्या प्रकारचे ट्वीट्स समीतने केलेत यावरून तो राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येते. तसेच त्याच्यामागे एखादा मास्टरमाइंड असून तो समीतकडून हे ट्वीट्स करवून घेत असेल, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयाने समितला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ( Sent To Police Custody Till Cctober 30 )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप समीतवर आहे. समीतने केलेल्या ट्वीट्सविरुद्ध नितीन तिवारी यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवित तपास सुरू केला होता. शुक्रवारी त्याला गुजरातमधील राजकोट येथून अटक करण्यात आली. बी. कॉमचे शिक्षण घेतलेला ३२ वर्षीय ट्वीटरवर प्रचंड सक्रिय आहे. त्याचे ट्वीटरवर ६० हजाराहून अधिक फॉलोवर्स असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांचा त्यात समावेश आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांसहित अनेकांनी त्याची पाठराखण केली होती.

समीत ठक्कर सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्वीट करतो. धार्मिक भावना दुखावतील आणि सामाजिक तेढ निर्माण होईल असे मजकूर ट्वीट करतो, असे आरोप शिवसैनिकांनी केले आहेत. दरम्यान, सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. समीतचे गुजरात आणि दिल्ली येथे संपर्क आहेत. तसेच ज्या प्रकारचे ट्वीट्स त्याने केलेत त्यामागे मास्टरमाइंड असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी त्याच्या दोन आठवड्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे तर आरोपीतर्फे अॅड. प्रकाश जयस्वाल, अॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अॅड. परीक्षित मोहिते यांनी बाजू मांडली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here