दुबई : किंग्स इलेव्हन पंजाबने आजच्या सामन्यात कोलकातावर दणदणीतव विजय मिळवला. पण पंजाबने फक्त या सामन्यातच कोलकाताला धक्का दिला नाही, तर गुणतालिकेतही त्यांना पिछाडीवर ढकलले आहे. कारण या मोठ्या विजयानंतर पंजाबने गुणतालिकेत मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

पंजाबचा हा सलग पाचवा विजय ठरला आहे. या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाने ११ सामने खेळले होते. या ११ लढतींमध्ये पंजाबला पाच विजय मिळता आले होते, तर त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पंजाबच्या संघाचे या सामन्यापूर्वी १० गुण होते. आजच्या सामन्यात पंजाबने कोलकातावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पंजाबला या विजयानंतर दोन गुण मिळाले आहे. त्यामुळे पंजाबच्या संघाचे आता १२ गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत कोलकाताला धक्का दिला आहे. पंजाबने कोलकाताचे चौथे स्थान पटकावले आहे. त्यामुळे कोलकाताची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

बाद फेरीत पोहोचण्यासाठी गुणतालिकेत अव्वल चार संघांमध्ये पोहोचणे सर्वात महत्वाचे आहे. गेले काही दिवस कोलकाताने गुणतालिकेतील चौथे स्थान कायम राखले होते. पण आजच्या सामन्यातील पराभामुळे त्यांना चौथे स्थान गमवावे लागले आहे. सध्याच्या घडीला पंजाब आणि कोलकाता यांचे समान १२ गुण आहेत. पण पंजाबचा रनरेट हा कोलकातापेक्षा चांगला असल्यामुळे त्यांनी चौथे स्थान पटकावले आहे.

आता बाद फेरीत पोहोचण्यासाठी पंजाब आणि कोलकाता यांना दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे यापुढील दोन सामन्यांमध्ये या दोन्ही संघांची कामगिरी कशी होते, यावर त्यांचे या आयपीएलमधील भवितव्य अवलंबून असेल. कारण दोनपैकी एक जरी सामना गमावला तरी त्यांना बाद फेरीत पोहोचण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आगामी दोन्ही सामने पंजाब आणि कोलकातासाठी महत्वाचे असतील. सध्याच्या घडीला गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या संघाने गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ यावेळी तिसऱ्या स्थानावर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here