नितीशकुमारांविरोधात असंतोष खूप आहे. एवढचं नव्हे तर भाजप नेत्यांमध्येही नाराजी आहे. यामुळे हे ठरवून केलं जात आहे, असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येतंय. नितीशकुमार यांची स्वच्छ प्रतिमा असूनही भाजप समर्थकही त्यांना मत देऊ इच्छित नाहीत. याचं कारण म्हणजे नर्बंध आणि सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचारामुळे सरकारविरोधात वाढती नाराजी आहे. चिराग पासवान यांनी १३५ उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. पण पंतप्रधान मोदींच्या नावाने मतं मागत नाहीत तोपर्यंत एनडीएला कुठलीही संधी मिळण्याची शक्यता नसल्याचं भाजपचं स्पष्ट मत आहे. बिहारमध्ये मोदींची लोकप्रियता कायम आहे, असा फिडबॅक भाजपला मिळाल आहे.
स्थलांतरी कामगारांचा मुद्दा आणि सामान्यांबाबत उदासिनतेमुळे मतदार नितीशकुमारांवर नाराज आहेत. आणि म्हणूनच सुशील मोदी आणि रविशंकर प्रसाद सोडून इतर कोणतेही भाजप नेते संयुक्त प्रचारासाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रतिमेच्या जोरावर मत मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितीशकुमार यांना अविश्वासाचा सामना करावा लागतोय. आता पण त्यांना पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या आणखी नऊ सभा होणार आहेत. यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या सभांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times