करोनामुळे गेले सहा महिने अंबाबाई मंदिर बंद आहे. नवरात्रोत्सव काळातही भाविकांना मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. सर्व धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते. नऊ दिवसात रोज सात ते आठ लाख यानुसार ८७ लाखावर भाविकांनी देवीचे ऑनलाइन दर्शन घेतले. दरवर्षी या काळात दोन कोटी रूपये देणगी जमा होते. यंदा मात्र बारा लाखाची देणगी जमा झाली.
शाही लवाजम्यासह दरवर्षी दसरा चौकात सोने लुटण्याचा कार्यक्रम होता. यंदा त्याला फाटा देत भवानी मंडपात राजघराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे , मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times