मुंबई: सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते, असे स्पष्ट करतानाच कॉंग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे समर्थन केले आहे. ( Leader and Minister Support CM )

वाचा:

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्या टीकेला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही. तर भाजपच धर्माच्या आधारावर राजकारण करून मतांचे राजकारण करते हे लोकांना आता माहीत झाले आहे, असे नमूद करत मलिक यांनी भाजपवर तोफ डागली.

वाचा:

शिवसेना विरुद्ध या दोन पक्षांत जो संघर्ष सुरू आहे त्यात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा आरसा भाजपला दाखवला आहे. अनेक आश्वासने देत भाजपकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे केले जाते, हे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय राज्यपाल असोत वा भाजप यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी परखड भाष्य केले, असे नमूद करत मलिक यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकच केले.

वाचा:

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली. हिंदुत्व, पाडापाडीचं राजकारण, जीएसटी, करोना, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, बिहार निवडणूक अशा सर्वच मुद्द्यांवरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. त्यांची ही टीका भाजपला चांगलीच झोंबली आणि भाजपने प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषदांचा धडाका लावला. आमदार आशिष शेलार आणि खासदार नारायण राणे यांच्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा झाल्या. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही निवेदन जारी करून मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सत्तेतील मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र उद्धव ठाकरे यांचे समर्थन करून महाविकास आघाडी एकजूट असल्याचेच दाखवून दिले आहे.

वाचा

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here