मागील महिनाभरत जागतिक पातळीवरील अनेक उलथापालथ झाली आहे. अमेरिका आणि इराण संघर्षाने निर्माण झाले होते. वर्षभर सुरु असलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाने शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण केली. त्यामुळे सोनं गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला असल्याचे मॉर्निगस्टारचे वरिष्ठ संशोधक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले. डिसेंबर २०१९ अखेर ‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणूक मालमत्ता ५७६८ कोटींपर्यंत वाढली आहे. यात गतवर्षच्या तुलनेत २६ टक्के वाढ झाली. डिसेंबर २०१८ मध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मधील मालमत्ता ४५७१ कोटी होती. ‘गोल्ड ईटीएफ’च्या तुलनेत शेअरमधून चांगला परतावा मिळत असल्याने गुंतवणूकदार शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करत होते. मात्र असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडच्या (अॅम्फी)आकडेवारीनुसार २०१९ मध्ये गुंतवणूकदारांनी ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये १६ कोटींची गुंतवणूक केली. बाजारातील १४ गोल्ड लिंक्ड ईटीएफ गुंतवणूक योजनामध्ये ही गुंतवणूक करण्यात आली. दीर्घ कालावधीनंतर ‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणुकीचा ओघ वाढला.
कमी परतावा मिळत असल्याने २०१८ मध्ये गुंतवणूकदारांनी २०१८ मध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मधून ५७१ कोटी काढून घेतले होते. त्याआधी २०१७ मध्ये ७३० कोटी, २०१६ मध्ये ९४२ कोटी, २०१५ मध्ये ८९१ कोटी, २०१४ मध्ये १६५१ कोटी आणि २०१३ मध्ये १८१५ कोटी गुंतवणूकदारांनी काढून घेतले. २०१२ मध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये १८२६ कोटींची गुंतवणूक झाली होती. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती , व्यापारी युद्ध आणि अनिश्चितता यामुळे सोने गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय म्हणून लोकप्रिय झाले आहे. २०१९ मध्ये सोने दराने उचांकी स्तर गाठला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times