जयपूरः करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मास्क घालणं बंधनकारक करण्याचा विचार करत आहे. यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक आणलं जाणार आहे. मुख्यमंत्री यांनी सोमवारी कोरोनाविरोधातील लढाईतबाबत ही माहिती दिली. लस येईपर्यंत मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग राखणं आणि वारंवार हात धुणं अशा उपाययोजनांचा अवलंब केल्यावरच करोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो, असं गहलोत म्हणाले.

राजस्थानमध्ये २ नोव्हेंबरपासून ‘नो मास्क-नो एन्ट्री-पब्लिक मुव्हमेंट अगेन्स्ट करोना’ हे अभियान राबवलं जात आहे. या अभियानाला यश आलं आहे. याबद्दल मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोमवारी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अभियानाच्या यशस्वीतेसाठी गहलोत यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, एनसीसी, एनएसएस, स्काउट्स व मार्गदर्शक व नेहरू युवा केंद्राचे संयोजक, कार्यक्रम अधिकारी, कॅडेट्स, स्वयंसेवकांचं कौतुक केलं.

‘नो मास्क-नो एन्ट्री’च्या यशासाठी प्रत्येक जण वचनबद्ध

राज्यातील गाव-खेड्यापर्यंत हे अभियान यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने व प्रत्येक घटकाने सरकारला साथ दिली. मास्क घातलेल्या व्यक्तीही करोना बाधित आहे याबाबत जनता जागरूक होत नाही तोपर्यंत संसर्ग पसरत राहणार. यामुळे तोपर्यंत हे अभियान पूर्णपणे यशस्वी होणार नाही. करोनाला हरवण्यासाटी एनसीसी, एनएसएस आणि नेहरू युवा केंद्राशी संबंधित कॅडेट्स आणि स्वयंसेवकांनी प्रत्येक नागरिकाला या अभियानात जोडावं, असं आवाहन गहलोत यांनी केलं.

फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करा

फटाक्यांच्या प्रदूषणामुळे करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यासह बाधित व्यक्ती आणि बरे झालेल्या नागरिकांच्या आरोग्यवरही विपरीत परिणाम होतो. आपण सर्वांनी यंदा फटाक्यांशिवाय दीपावली साजरी करावी आणि करोनापासून नागरिकांची रक्षा करण्यासाठी इतरांनाही प्रेरित केले पाहिजे, असं मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here