नगर: जिल्ह्यातील शहर परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये अशा सूचनाच पाथर्डी नगर परिषदेने जारी केली आहे. याबाबतचे पत्रकच नगर परिषदेने काढले आहे. दरम्यान, बिबट्यामुळे घराबाहेर न पडण्याची सूचना देण्याची या भागातील ही पहिलीच वेळ असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.

वाचा:

पाथर्डी तालुक्यात बिबट्यांचा वावर आणि उपद्रवही वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अंगणात आजोबांसोबत जेवण करणाऱ्या चिमुकलीला बिबट्याने फरफटत नेले होते. तर, पाथर्डी शहरापासून जवळच असणाऱ्या शिवारात देखील आठ वर्षाच्या मुलाला बिबट्याने रात्रीच्या वेळी उचलून नेल्याचा प्रकार दसऱ्याच्या दिवशीच घडला आहे. दसऱ्याच्या दिवशी आजोबांच्या कुशीतून उचलून नेलेल्या (वय ८) याला बिबट्याने ठार केले. सकाळी त्याचा मृतदेह घराजवळच शेतात अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील बिबट्या दिसला होता. मात्र, त्याला पकडण्यात यश आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लवकरात लवकर बिबट्याला पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाचा:

बिबट्याचा वावर हा पाथर्डी शहराच्या परिसरात असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. वनविभागाच्या सूचनेनंतर पाथर्डी नगर परिषदेने तर पाथर्डी शहराच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनच केले आहे. याशिवाय पहाटेच्या वेळी फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असेही नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता येथील नागरिक देखील अधिकच सतर्क झाले असून नगर परिषदेने काढलेले पत्रक वेगाने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येऊ लागले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here