मुजफ्फरपूरः बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये ( ) प्रचारसभेनंतर व्यासपीठावरून मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar ) उतरताच काही तरुणांनी ‘नितीशकुमार मुर्दाबाद’ अशी नारेबाजी केली. यावेळी गर्दीतील एकाने नितीशकुमार यांच्यादिशेने चप्पलही भिरकावली. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी ४ तरुणांना ताब्यात घेतलं आहे. मुजफ्फरपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सभा झाली होती. यासभेतही नितीशकुमार मुर्दाबाद, अशी नारेबाजी केली गेली. यावेळी नितीशकुमार यांनी नारेबाजी करणाऱ्यांना सुनावलं. जो जिंदाबाद आहे, त्याची सभा ऐकण्यासाठी जा, असं नितीशकुमार म्हणाले.

बिहारमध्ये आपली पुन्हा सत्ता आल्यास राज्यात २४ तास वीजपुरवठा होईल. प्रत्येक घरात सौर पथदिवे असतील. स्वच्छतेबरोबरच तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली जाईल, असं आश्वासन नितीशकुमार यांनी मतदारांना दिलं.

गेल्या १५ वर्षात राज्यात वेगवान विकास झाला आहे. महिलांना आरक्षण, युवकांना क्रेडिट कार्ड, सायकली, कपडे आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. १५ वर्षांत रस्ते तयार करण्यात आले, पूल बांधले गेले, असं नितीशकुमार म्हणाले.

मुजफ्फरपूरमध्ये रविवारी नितीशकुमारांच्या प्रचारसभेत भाषणावेळी काही तरुणांनी घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या तरुणांनी सभेच्या मध्यभागी बसून नितीशकुमार यांच्याविरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सभेतून बाहेर काढले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here