मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सलग २५ व्या दिवशी जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

आज सिंगापूरमध्ये कमॉडिटी बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.३ टक्क्यांनी वधारले आहेत. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव ४०.५८ डॉलर प्रति बॅरल आहे. अमेरिकेतसुद्धा तेलाचा भाव वाढला. सोमवारी कच्चे तेल प्रती बॅरल ३८.६९ डाॅलरवर बंद झाले. त्यात १३ सेंटसची वाढ झाली. उत्पादन कपातीमुळे तेलाला काहीसा आधार मिळेल. युरोप व उत्तर अमेरिकेतील विषाणू प्रसार व लॉकडाऊन स्थइतीमुळे तेलाच्या अर्थकारणावर परिणाम होऊन दरांवर आणखी दबाव आला आहे.

लिबियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्राने पुन्हा उत्पादन सुरु केल्याने त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. मात्र मागणीत उदासीनता कायम असल्याने तेलाच्या दरांवर आणखी नकारात्मक परिणाम झाला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार अमेरिकी तेलसाठा मागील आठवड्यात १ दशलक्ष बॅरलपर्यंत होता. कारण डेल्टा चक्रीवादळाने किनारीभागातील कामकाज ठप्प होते. तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने सौदी अरेबियातील क्रूड निर्यातीला गती मिळाली. ऑगस्ट २०२० मध्ये ही निर्यात दररोज ५.९७ दशलक्ष एवढी होती. लिबियातील क्रूड उत्पादनातही वाढ झाली असून सर्वात मोठे तेलक्षेत्र शरारा येथे पुन्हा उत्पादन सुरु झाल्याने तसेच मागणीतील उदासीनतेने तेलातील नफ्यावर मर्यादा आल्या. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची चिंता आणि लिबियातील उत्पादन वाढीमुळे नफ्याबाबत साशंकता आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती अधिक विश्वासार्ह कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या इंडिया एनर्जी फोरममध्ये केले. तसेच तेल आणि वायू या दोन्हींसाठी पारदर्शक व लवचिक बाजारपेठा निर्माण करण्याच्या दिशेने काम करण्याचे त्यांनी समुदायाला आवाहन केले आहे. ते म्हणाले की नैसर्गिक वायूचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि गॅसच्या बाजारभावात समानता आणण्यासाठी सरकारने नैसर्गिक वायू विपणन सुधारणा आणल्या आहेत, यात ई-निविदांच्या माध्यमातून नैसर्गिक वायूच्या विक्रीत विपणनाला अधिक स्वातंत्र्य मिळेल. ते म्हणाले की, भारतातील पहिले स्वयंचलित राष्ट्रीय स्तरीय वायू व्यापार व्यासपीठ यावर्षी जूनमध्ये सुरू करण्यात आले, जे गॅसच्या बाजारभावासंदर्भात मानक प्रक्रिया ठरवते.

सरकार ‘आत्मनिर्भरते’च्या दृष्टीने पुढे जात असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी स्वावलंबी भारत ही मोठी शक्ती असेल आणि या प्रयत्नांचे मूळ केंद्र ऊर्जा सुरक्षा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या प्रयत्नांना यश येत असून या आव्हानात्मक काळात वायू मूल्य साखळीत गुंतवणुकीत वाढ होत आहे तसेच इतर क्षेत्रातही सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. सरकार जागतिक स्तरावरील ऊर्जा कंपन्यांबरोबर धोरणात्मक आणि सर्वंकष भागीदारी करत असल्याचे ते म्हणाले. भारताच्या शेजारील राष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणून परस्पर फायद्यासाठी शेजारच्या देशांसमवेत ऊर्जा कॉरिडोरचा विकास करण्याला प्राधान्य दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here