मुंबई: ‘ ही जणू आपलीच मक्तेदारी आहे. जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विकृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले आहेत. पण, सरसंघचालकांनी नागपुरातील विजयादशमी मेळाव्यात त्या ठेकेदारांचे दात घशात घातले आहेत,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे.

दसऱ्याच्या निमित्तानं नागपुरात झालेल्या आरएसएसच्या व मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातील भाषणांचं विश्लेषण ‘सामना’च्या अग्रलेखातून आज करण्यात आलं आहे. हे विश्लेषण करताना शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा घणाघाती हल्ला चढवला आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. खुद्द राज्याचे राज्यपाल यांनीही मुख्यमंत्र्यांना ‘तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?’ अशी विचारणा केली होती. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक यांनी केलेल्या भाषणामुळं शिवसेनेला आयतीच संधी मिळाली आहे. भागवत यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाचा व्यापक अर्थ सांगितला होता. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका भागवत यांनी मांडली होती. तोच धागा पकडून शिवसेनेनं भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

वाचा:

सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर शिवसेना गप्प का, असं विचारणाऱ्या भाजपलाही शिवसेनेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात. त्यामुळं भाजपचं गाईचं हिंदुत्व तकलादू आहे. ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असं भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत. भाजपचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

‘हिंदुत्वाची व्याख्या आज कधी नव्हे इतकी संकुचित झाली आहे. बलात्कार, खून यांसारख्या प्रकारांतही अनेकांना हिंदुत्व दिसू लागले आहे हे धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशात परवानगीशिवाय दाढी ठेवली या कारणाखाली एका पोलीस फौजदाराला सरकारने निलंबित केले. त्याचे तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले, पण राजकारणात, पेंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांनी दाढी ठेवली आहे. हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही,’ असंही शिवसेनेनं सुनावलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here