मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक () दिवसभरात एका सत्रात ७३७ अंकांनी कोलमडला, मात्र बाजार बंद होताना तो ५४० अंकांनी वधारून ४०,१४५.५० वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक () १६२.६० अंकांनी खाली येऊन ११,७६७.७५च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सच्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटोला सर्वाधिक फटका बसला. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टेक महिंद्र, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांनाही तोटा सहन करावा लागला. सेन्सेक्समध्ये सर्वांत ‘वजनदार’ कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग अॅमेझॉन-फ्युचर प्रकरणामुळे ३.९७ टक्के घसरला. दिवसभरात नेस्ले इंडिया, कोटक बँक, इंड्सइंड बँक, पॉवरग्रीड आणि एचयूएल या कंपन्यांचे समभाग २.४८ टक्क्यांपर्यंत वधारले.
जागतिक स्तरावर भांडवल बाजारात उदासीनता दिसून आली. युरोपातील अनेक देशांमध्ये कोव्हिड-१९ संसर्गाची दुसरी लाट आल्यामुळे व्यापारउदिमावर परिणाम झाला आहे. त्याच वेळी अमेरिकेत निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे तेथील सरकारकडून आर्थिक पॅकेज दिले जाण्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. या दोन्हींचा परिणाम जागतिक भांडवल बाजांरावर नकारात्मक दिसून आला. शांघाय, टोकियो आणि सोल येथील भांडवल बाजारांची नकारात्मक वाटचाल झाली. युरोपातील भांडवल बाजारांतही फारशी हालचाल दिसून आली नाही.
क्षेत्रीय निर्देशांकांकडून निराशा
दिवसभरात मुंबई शेअर बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांनी मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. बीएसई एनर्जी, मेटल, ऑटो, रिअॅल्टी, ऑइल अँड गॅस, बँकेक्स आणि फायनान्स हे क्षेत्रीय निर्देशांक ३.५१ टक्क्यांपर्यंत पडले. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकही १.७७ टक्क्यांपर्यंत खाली आले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये केवळ एफएमसीजी निर्देशांकच तेवढा ०.११ टक्क्यांनी वर गेला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times