बीड: सुरक्षित वावराचे नियम मोडल्याबद्दल भाजपच्या नेत्या व माजी मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे समजताच पंकजा यांनी संताप व्यक्त केला आहे. पंकजा यांनी त्या संदर्भात एक सूचक ट्वीट केलं आहे.

दसऱ्याच्या निमित्तानं पंकजा यांनी रविवारी सावरगाव येथून ऑनलाइन मेळाव्याला संबोधित केले. मात्र, मेळावा ऑनलाइन असतानाही प्रत्यक्षात जिथे पंकजा उपस्थित होत्या, तिथं कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी पंकजा यांच्यासह ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात खासदार डॉ. भागवत कराड, महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, माजी आमदार भीमराव धोंडे यांचाही समावेश आहे.

वाचा:

पंकजा यांनी या कारवाईबद्दल ट्वीट केलं आहे. ‘अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर…’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राज्यात आतापर्यंत अनेक नेत्यांनी दौरे केले, त्यांच्या दौऱ्यांतही गर्दी झाली मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here