मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईत दहशतवादी आणि देशविरोधी ड्रोन, रिमोटवरील मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, मिसाइल, पॅराग्लायडरद्वारे हल्ला करू शकतात, असे पोलिसांनी सांगितले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्ती किंवा गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतात. मुंबईसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले जाऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले.

गुप्तचर विभागाने पत्राद्वारे दिलेल्या माहितीनंतर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाकडून हल्ल्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर ड्रोन, रिमोटवरील मायक्रो लाइट एअरक्राफ्ट आदी उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पुढील ३० दिवस हे आदेश लागू असणार आहेत, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

हल्ल्याच्या शक्यतेनंतर मुंबई पोलिसांनी सर्वसामान्यांना आवाहन केले आहे. शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सतर्क राहा, असे आवाहन डीसीपी चैतन्य यांनी केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here