नवी दिल्ली: फरिदाबादमधील वल्लभगड येथे अगरवाल महाविद्यालयाच्या समोर दोन तरुणांनी एका तरुणीची दिवसाढवळ्या गोळी झाडत हत्या केली (). या अमानुष हत्येचे उपलब्ध झाले आहे. या प्रकरातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तौफीक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हरयाणातील मेवातचा रहिवासी आहे, अशी माहिती वल्लभगडच्या पोलिस उपायुक्तांनी माहिती देताना सांगितले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

या सीसीटीव्ही फूटेजनुसार, अगरवाल महाविद्यालयाच्या समोर एका पांढऱ्या I20 कार मधून दोन तरूण बाहेर आले आणि त्यांनी या दोन तरुणींना अडवले. त्यानंतर त्यांपैकी एका तरुणाशी तरुणीशी बाचाबाची झाली. त्यानंतर त्या तरुणाने त्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध केला. त्यानंतर त्या तरुणाने रिव्हॉल्वहस बाहेर काढत थेट तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर ती तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमाराला घडली. निकिता तोमर असे या तरुणीचे नाव असून ती बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. परीक्षा देऊन महाविद्यालयाबाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला.

क्लिक करा आणि वाचा-

हा खून केल्यानंतर हल्लेखोर कारने पळून गेला. फॉरेन्सिक सायन्स पथकाने घटनास्थावरून पुरावे गोळा केले आहेत. या हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निकात तोमर हिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here