मुंबईः ‘मराठा आरक्षणाच्या केसचा पुकारा झाला तेव्हा कोणीही हजर नव्हतं, याला काय म्हणायचं? असा सवाल करतानाच, ‘सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नाही, हे आज दिसून आलं,’ अशी टीका यांनी केली आहे. मराठा आरक्षणाला चार आठवडे स्थगिती मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर सडकून टीका केली आहे.

‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा आरक्षणप्रकरणी ठाकरे सरकार गंभीर नाही. यावरून सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये हेच दिसून येतं,’ असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘चार आठवडे प्रकरणाला स्थगिती दिली आहे त्यामुळं सगळं काही ठप्प झालं. राज्याच्या शिक्षण क्षेत्रातही गोंधळ निर्माण झाला. सरकारच्या वकिलांना कोर्टातही वेळेवर जाता येत नाही. सरकारच्या दोन्ही वकिलांमध्ये समन्वय नाही. आज सुनावणी होणार होती तर मंत्र्यांनी दिल्लीत जाऊन वकिलांशी आधीच संवाद का नाही साधला. पण सरकारकडून काहीच ठोस पावलं उचलली गेली नाही,’ असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘मराठा आरक्षणावर आम्हाला राजकारण करायचं नाही. पण दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं मराठा सामाजाच्या दृष्टीनं आम्ही बांधील आहोत, पण आधी स्थगिती तर उठवा. देवेंद्र फडणवीस यांना बोलावून एकदा बैठक घेण्याचं नाटक सरकारने केलं. मात्र, मराठा आरक्षण प्रश्नी पुढची दिशा ठरलेली नाही,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here