मुंबई : जागतिक ना नफा संस्था हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीने हा गृहनिर्माण प्रकल्पाचा उपक्रम हाती घेतला आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन नुकताच आदित्य बिर्ला समूहाच्य़ा आणि इंडियाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला यांच्या हस्ते झाले. कोविड-१९ निर्बंधांमुळे आभासी स्वरूपाच्या या कार्यक्रमात त्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांना ही घरे प्रदान केली.

हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीने भारतातील १९ राज्यांत ११ लाख लोकांपर्यंत सेवा पोहचविण्याच्या या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद केली आहे.कोविड-१९ संकटाविरोधातील मोहिमेचे १० लाखांहून अधिक लाभार्थी आहेत.

संपूर्ण देश कोविड -१९ साथीने कवेत घेतले असताना, आम्ही आज भारतातील १९ राज्यांत ११ लाख लोकांपर्यंत सेवा पोहचविण्याच्या या महत्त्वाच्या टप्प्याची नोंद केली आहे. शाहिद अर्जुन बिरांगे, शहिद स्वप्निल चारपळे, शहिद शशिकांत माने आणि शहिद निगप्पा चावरे यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांनी हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीच्या भागीदारीत स्वतःचे घर बनवण्याच्या दिशेने या निमित्ताने प्रवास सुरू केला आहे, असे राजश्री बिर्ला यांनी सांगितले. आदित्य बिर्ला समूहाच्या नेतृत्वाखाली योजलेल्या उपक्रमांमधून आजवर ४००० घरे बांधली गेली आहेत आणि गेल्या दोन दशकांत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीमध्ये समूहाने ४० लाख डॉलरची गुंतवणूक करून, भारतात तसेच जगभरातील निवारा आणि स्वच्छता प्रकल्पांसाठी हातभार लावला आहे. शहिदांच्या या घरांसाठी अर्थसाहाय्य आर. रामकृष्णन, डी. टी. थॉमस, चरणदीप सिंग, आशीष कचोलिया आणि डी. सी. पटेल यांनी केले आहे. ट्रान्स्फॉर्मिया अ‍ॅडव्हायझर्स एलएलपीचे मॅनेजिंग पार्टनर आर. रामकृष्णन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये हॅबिटॅटसाठी निधी उभा करणाऱ्या वार्षिक गोल्फ स्पर्धेच्या आयोजनानंतर क्राउडफंडिंगद्वारेही पैसा उभारला आहे.

मागील २१७ दिवसांत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने १९ राज्यातील ११,०७,४५२ लोकांपर्यंत सेवा पोहचविली. ज्यात ४,०५,८९२ लोकांना स्वच्छतेचे आणि कुटुंबासाठी अत्यावश्यक गोष्टींचे संच, १,४७,२०० लोकांना विशिष्ट अटींसह रोकड निधी हस्तांतरण, ६४.६३६ लोकांना स्वच्छतेच्या सवयींबाबत प्रशिक्षण दिले गेले आणि १२ ठिकाणी १,३८७ खाटा असलेले कोविड-१९ निगा केंद्र उभारून अलगीकरण आवश्यक असलेल्या लोकांची सोय केली गेली.हॅबिटॅटच्या कोविड-१९ मोहिमेत ६५ कॉर्पोरेट, ३४,४८० व्यक्ती आणि १९०३ विद्यार्थ्यांनी योगदान दिले. ५७ ग्रासरूट भागीदार, १,३८१ स्वयंसेवक आणि २९ सरकारी विभागांची देशभरातील गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत दुर्गम निर्वासित प्रदेशात लढा देणाऱ्या शूरवीरांच्या बलिदानाचा ऋणी आहे. अशा शहिद जवानांना आदरांजली म्हणून हॅबिटॅट फॉर हीरोज हा आमचा गृहनिर्माण प्रकल्प आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना शाश्वत निवारा मिळवून देणे ही आमची बांधिलकी आहे, असे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन सॅम्युअल यांनी सांगितले.

“माझे पती २००१ मध्ये जेव्हा शहीद झाले तेव्हा आमचे कुटुंब शोकविव्हळ झाले. आम्ही आमच्या पायांवर परत उभे राहण्याचा प्रयत्न करीत होतो पण गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे आमचे घर उद्ध्वस्त केले. हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाने त्या आपत्तीनंतर आम्हाला जगण्यास मदत केली आणि आता लवकरच आम्हाला आमचे स्वतःचे घर मिळेल. साथीच्या काळात हे घर आम्हाला विषाणूच्या संसर्गापासून वाचवू शकेल, शहिद नायक अर्जून बिरांगे यांच्या पत्नी अर्चना बिरांगे यांनी हे मनोगत समारंभात बोलताना व्यक्त केले. अर्चना या सैनिक कोल्हापूरमधील टाकळी गावाच्या आहेत. एक असे गाव जेथे प्रत्येक कुटुंबातील किमान एक तरी व्यक्ती भारतीय सैन्य दलाच्या सेवेत आहे. अर्चना यांच्यासह, गीतांजली चारपळे, अक्काताई माने आणि विजूताई चावरे यांचे स्वत:चे घर उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here