फक्त ५ राज्यांमध्ये ४९.४ टक्के रुग्ण
गेल्या २४ तासांत केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत ४९.४ टक्के इतक्या करोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सणासुदीचा काळ ही याला एक मोठं कारण असू शकते. ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि आम्ही या राज्यांच्या सरकारांशी सतत बोलत आहोत. करोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७८ टक्के रुग्ण हे देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.
५ आठवड्यांपासून मृतांच्या संख्येत घट
गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण हे ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटकचा समावेश आहे. पण गेल्या पाच आठवड्यांपासून, करोनाने होणाऱ्या मृत्युचा आलेख भारतात उतरता आहे. करोनाने भारतात आतापर्यंत १ लाखाहून अधिक मृत्यू झाले आहेत.
युरोप आणि अमेरिकेला मोठा फटका
करोना व्हायरस पुन्हा एकदा युरोपियन देशांमध्ये विनाशाला सुरुवात केली आहे. युरोपमधील देशांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव युरोपातील बर्याच देशांमध्ये अतिशय वेगाने वाढताना दिसतोय, असं याबाबत माहिती देताना निती अयोगचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले.
युरोपियन देशांमध्ये करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यापेक्षा अधिक नुकसान होताना दिसतंय. अनेक नागरिकांना करोनाच्या संसर्गाचा सामना करावा लागतोय. तिथे करोना संसर्ग पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेतील नागरिक तर करोनाच्या तिसर्या लाटेच्या सामना नागरिकांना करावा लागतोय. अमेरिकेत सध्या करोनाची २८ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असं पॉल म्हणाले.
करोना व्हायरसचा अत्यधिक प्रसार हा कमी संख्येतही होऊ शकतो. केवळ २-४ जणांना संसर्ग होत असेल तर. अशा प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, असं डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितलं. करोना व्हायरसचा संसर्गाचा वेग अधिक आहे. हे व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याच कारण असल्याने तज्ञ आधीच चिंतेत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times