दुबई : सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आज कर्णधार डेव्हिड वॉर्नरला वाढदिवसाची विजयी भेट दिल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आजच्यात सामन्यात सनरायझर्स हैदराबादपुढो लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादने दिल्लीपुढे २२० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादने भेदक गोलंदाजी करत दिल्लीच्या संघाला फक्त १३१ धावांमध्ये सर्व बाद केले आणि आजच्या सामन्यात त्यांनी ८८ धावांनी मोठा विजय साकारला. या विजयाचा नक्कीच फायदा हैदराबादच्या संघाला गुणतालिकेत होणार आहे. आता यापुढील दोन सामन्यांमध्ये ते कशई कामगिरी करतात, यावर त्यांचे आव्हान अवलंबून असेल.

हैदराबादने तुफानी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीपुढे २२० धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात हैदराबादने दिल्लीला शिखर धवनच्या रुपात धक्का दिला. धवनला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर हैदराबादने दुसऱ्याच षटकात मार्कस स्टॉइनिसलाही तंबूचा रस्ता दाखवला आणि त्यांनी दिल्लीची २ बाद १४ अशी अवस्था केली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनाही यावेळी चांगली फलंदाजी करता आली नाही. पण त्याचबरोबर रशिद खानने आजच्या सामन्यात विक्रम रचल्याचेही पाहायला मिळाले.

रशिदने सातव्या षटकात दिल्लीच्या संघाला दोन धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. रशिदने सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरला बाद केले. हेटमायरला त्रिफळाचीत करत रशिदने आपला पहिला बळी मिळवला. त्यानंतर या सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्थिरस्थावर झालेल्या अजिंक्य रहाणेला बाद केले. रशिदने अजिंक्यला यावेळी पायचीत पकडले. अजिंक्यला यावेळी २६ धावा करता आल्या.

रशिदने त्यानंतर आपला तिसरा बळी मिळवला. रशिदने यावेळी अक्षर पटेलला बदली खेळाडू प्रियम गर्गकरवी झेलबाद केले. अक्षरला यावेळी फक्त एका धावेवर समाधान मानावे लागले. रशिदने या सामन्यात तीन महत्वाच्या विकेट्स तर मिळवल्याच, पण त्याचबरोबर चार षटकांमध्ये फक्त सात धावाच दिल्या. त्याचबरोबर १७ चेंडू यावेळी निर्धावही टाकली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here