पाटणाः लोकजनशक्ती पार्टीचे () प्रमुख ( chirag paswan ) यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar )यांना लक्ष्य केलं आहे. वडिलांच्या निधनाने मी किती दु: खी होतो हे सिद्ध करावं लागेल का?, असं म्हणत चिराग यांनी नितीशकुमारांवर निशाणा साधला. यासोबतच व्हिडिओ शूट करणं का महत्त्वाचं होतं, हे ही सांगितलं.

‘वडिलांच्या निधनानंतर फक्त ६ तासांत आपल्याला पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी द्यावी लागणार होती. पक्षाची सर्व कामं मलाच पूर्ण करावी लागतील. १० दिवस आपल्याला घराबाहेर पडता येणार नव्हतं. तसंच डिजिटल प्रचारासाठी व्हिडिओ शूट करावा लागणार होता, असं पासवान म्हणाले. चिराग पासवान यांनी हे ट्वीटमधून स्पष्ट केलं.

‘वडिलांच्या निधनाने किती दु: खी झालो हे मला नितीशकुमार यांच्यासमोर सिद्ध करावं लागेल का? माझ्याकडे काय पर्याय आहे. ऐन निवडणुकीत प्रचार सुरू असताना वडिलांचं निधन झालं. मी रोज शूटिंग करतोय, असं पासवान म्हणाले.

एलजेपीचा दावा

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एलजेपीने एक निवेदन जारी केलं आहे. चिराग पासवान आपल्या ‘बिहारी फर्स्ट, बिहार फर्स्ट’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे व्हिडिओ शूट करत आहेत. हा व्हिडिओ त्याचा आहे. नितीशकुमारांना आता त्यांच्या पराभवावर विश्वास बसू लागला आहे. पक्षाला निवडणूक लढवायची आहे, मग व्हिडिओ शूट तर होणारत ना. जेडीयू नेते पराभवाच्या भीतीने अत्यंत खालच्या पातळीवर आले आहेत. हा व्हिडिओ पक्षाचा जाहीरनामा लाँच करण्यासाठी शूट करण्यात आला आहे आणि यावर आक्षेप का असावा? नितीशकुमारांना जनता उत्तर देईल आणि त्यांना पदावरून पायउतार होणं निश्चित आहे, असं जेडीयूने म्हटलंय.

जेडीयूने काय म्हटलं?

चिराग पासवान यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर जेडीयूने टीका केली होती. चिराग पासवान यांनी वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी बेशुद्ध होण्याचं नाटक केलं होतं. चिराग पासवान यांनी वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या दुसर्‍याच दिवशी हा व्हिडिओ शूट केला आणि वडिलांच्या मृत्यूचं भांडवल करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी केला. व्हायरल व्हिडिओमध्ये चिराग पासवान हे वडील रामविलास पासवान यांच्या फोटोजवळ उभे राहून स्मित हस्य करताना दिसत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here