पुणे: ‘ऊस तोडणी कामगारांचे नेतृत्व माझ्यासाठी महत्त्वाचे नसून, या कामगारांचे पालकत्व माझ्याकडे आहे. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही’ असे सांगत माजी मंत्री यांनी आपणच ऊस तोडणी कामगारांच्या नेत्या असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. ‘यावर्षी काहीजणांनी विसंगती घडविण्याचा प्रयत्न केला; पण मी कामगारांना कामावर जाण्यास सांगितल्यावर खरे कामगार हे कामावर गेले’, असे वक्तव्य करत त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर निशाणा साधला. ( Criticizes )

वाचा:

ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याच्या विषयावर मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघेही हजर होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘ऊस तोडणी कामगारांचे नेतृत्व महत्त्वाचे नाही. या कामगारांचे पालकत्व महत्त्वाचे आहे आणि ते माझ्याकडे आहे. यावेळी मी कामगारांना कामावर जाण्यास सांगितल्यावर खरे कामगार हे कामावर गेले. काहीजणांनी विसंगती घडविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असे पंकजा म्हणाल्या. काहीजण पराभव साजरा करायला येतात, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना मुंडे म्हणाल्या, ‘इतके दिवस सगळे म्हणत होते की, ताई घराच्या बाहेर पडत नाहीत. आता बाहेर पडले तर म्हणत आहेत की, पराभव साजरा केला. पराभव साजरा करण्याची खिलाडूवृत्ती माझ्यात आहे. पराभव साजरा करायलाही नशीब लागते’.

वाचा:

दरम्यान, यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे शेजारीच बसले होते. ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रमुख निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे ऊस तोडणी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतला गेला आहे. ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरवाढीच्या मुद्द्यावर दर तीन वर्षांनी करार करण्यात येतो. यावर्षीचा हा करार २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे. या करारानुसारच ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे या कामगारांना सरासरी ३५ ते ४५ रुपये जास्त मजुरी मिळणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here