भोपाळ: माजी सहकारी आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ( ) यांची आपण भेट घेतली आणि पोटनिवडणुकीत प्रचारासाठी मध्य प्रदेशात आल्यावर त्यांचे स्वागतही केलं, असं भाजपचे खासदार ( ) यांनी मंगळवारी सांगितलं.

सचिन पायलट हे मध्य प्रदेशात काँग्रेच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. पायलट हे सकाळी ग्वाल्हेर-चंबळ भागांमध्ये प्रचार करण्यासाठी दोन दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. ग्वाल्हेरमध्ये त्यांचं सकाळी आगमन झालं. मी त्यांना ग्वाल्हेर येथे भेटलो आणि त्यांचं स्वागत केलं. स्वागत करण्याची मध्य प्रदेशची परंपरा आहे, म्हणून आपण त्यांचं येथे स्वागत केलं, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

पायलट यांनी कॉंग्रेसच्या बाजूने प्रचार केल्यामुळे पोटनिवडणुकीवर काय फरक पडेल? असा प्रश्न ज्योतिरात्य शिंदेंना करण्यात आला. लोकशाहीत प्रचार करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, असं उत्तर शिंदे यांनी त्यावर दिलं.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत येत्या ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला मतमोजी होऊन त्याच दिवशी निकाल लागणार आहे. राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगापूर्वी पायलट यांची भेट घेण्याबाबत शिंदे यांना प्रश्न केला गेला. कॉंग्रेसच्या अंतर्गत बाबींविषयी भाष्य करण्याची आपल्याला इच्छा नाही, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधा बंड पुकारले होते. जवळपास महिनाभर हे बंड सुरू होते. अखेर काँग्रेस हायकमांडने सचिन पायलट यांच्या बंडाची दखल घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि त्यांनतर पायलट यांनी पुन्हा काँग्रेससाठी काम सुरू केले.
पायलट यांचे मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या मार्चमध्ये कॉंग्रेस सोडलेली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here