नवी दिल्लीः अर्थव्यवस्थेत आता सुधारणेची ( indias growth ) चिन्हे दिसत आहेत. पण चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) विकास दर घसरेल किंवा शून्याच्या जवळ येईल, असं अर्थमंत्री ( ) यांनी मंगळवारी सांगितलं.

२०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे आणि यामुळे जीडीपीचा विकास दर संपूर्ण आर्थिक वर्षात नकारात्मक किंवा शून्याच्या जवळ असेल. सणासुदीच्या काळात झालेल्या खरेदीतून भारतीय अर्थव्यवस्थेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या सार्वजनिक खर्चाद्वारे आर्थिक हालचाली वाढवण्यावर सरकारचा भर आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

करोना व्हायरस संसर्गामुळे सरकारने २५ मार्चपासून कडक लॉकडाउन घोषित केला होता. कारण लोकांचे प्राण वाचवणं अधिक महत्वाचं होतं. लॉकडाउनमुळेच संसर्गविरोधात लढण्यासाठी सरकारला तयारी करता आली, असं इंडिया एनर्जी फोरमध्ये सांगितलं.

आर्थिक उलाढाल सुरू झाल्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्थेला आणखी वेग मिळेल. यासह चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीत विकास दर सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे, असं सीतारामन म्हणाल्या.

एकूणच २०२०-२१ मधील जीडीपी विकास दर नकारात्मक असेल किंवा शून्याच्या जवळ असेल. अर्थमंत्री पुढील आर्थिक वर्षापासून विकास दर सुधारेल. सार्वजनिक खर्चातून आर्थिक कामे वाढवण्यावर सरकारचा भर आहे, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here