कोल्हापूर: नगरपालिकेतील कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने आत्मदहन केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर नगरपालिकेसमोर अनेक संघटनांनी आंदोलन करत नगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली. ( Latest Updates )

वाचा:

ठेकेदाराविरोधात तक्रार करूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याने या कार्यकर्त्याने सोमवारी आत्मदहन केले. दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी पहाटे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुख्याधिकारी , माजी मुख्याधिकारी दीपक पाटील, आरोग्य निरीक्षक सुनिलदत्त संगेवार, ठेकेदार यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेसह अनेक संघटनांनी पालिकेसमोर जोरदार निदर्शने करत पालिका बरखास्त करण्याची मागणी केली.

वाचा:

नेमके काय घडले होते?

इचलकरंजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांचा गेली अनेक वर्षे लढा सुरू होता. आठ दिवसांपूर्वीच एका घंटागाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेत असताना भोरे यांनी नगरपालिकेच्या ठेकेदाराला रोखले होते. त्यावरून ठेकेदार व भोरे यांच्यात मोठा वाद झाला होता. मृत जनावर ओढत नेण्याऐवजी घंटागाडीत टाकून घेऊन जा, अशी विनंती भोरे यांनी ठेकेदाराला केली होती. त्याला नकार देत ठेकेदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी भोरे यांनाच शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. यानंतर भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत पुराव्यासह तक्रार केली. पण, अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर शनिवारी भोरे यांनी टोकाचा इशारा दिला. सोमवारपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास मी आत्मदहन करेन असे त्यांनी सांगितले. सोमवारी अकरा वाजेपर्यंत कोणतीही कारवाई संबंधितांवर झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भोरे यांनी नगरपालिकेच्या दारातच स्वतःला पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेने सगळेच हादरले. आग आटोक्यात आणली गेली पण तोपर्यंत भोरे ५० टक्केपेक्षा जास्त भाजले होते. त्यांना तातडीने आयजीएम व नंतर सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here