पिंपरी: पोलीस कारवाईदरम्यान मोबाइलवर केल्याच्या आरोपावरून दोघा युवकांवर ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. हेरगिरी केल्याचा ठपका या दोघा युवकांवर ठेवण्यात आला आहे. आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ठाण्यात हा प्रकार घडला. ( Dehu Road police station Case )

वाचा:

आणि अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एकावर यापूर्वी दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली आहे. त्याबाबत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्याला बोलाविण्यात आले होते. तेव्हा दोघेजण देहूरोड पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलीस बॉण्ड लिहून घेत असताना यातील एका युवकाने त्याच्या मोबाइलमध्ये याचे व्हॉइस रेकॉर्डिंग केले. त्याची गंभीर दखल घेत या दोघा युवकांवर हेरगिरीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

वाचा:

सैन्यदल, देशाच्या सुरक्षेबाबत माहितीची कोणी हेराफेरी करून कागदपत्र चोरली किंवा माहितीची देवाणघेवाण बेकायदेशीरपणे केल्यास लागू होणाऱ्या ऑफिशियल सीक्रेट्स ऍक्ट अंतर्गत या दोघा युवकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या युवकांनी नेमके कोणत्या उद्देशाने रेकॉर्डिंग केले हे तपासले जाईल. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, यापूर्वीही राज्यात असे काही प्रकार घडले आहेत. करोनाच्या काळात पोलीस कारवाई करत असताना नागरिकांनी त्याचे रेकॉर्डिंग केल्याचे अनेकदा समोर आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here