वाचा:
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशन कार्डधारकांना एक मे पासून स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप करण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइनमधून वगळल्या गेलेल्या किंवा ऑनलाइन नोंदणी नसलेल्या केशरी रेशनकार्डधारकांना धान्य वितरित होत आहे. या नागरिकांना आठ रुपये प्रति किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलोने तांदूळ याप्रमाणे प्रति व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत आहे. या लाभार्थ्यांसाठी जुलै महिन्याचे धान्य उपलब्ध झाले आहे.
वाचा:
याबाबत शहर अन्नधान वितरण अधिकारी म्हणाल्या, ‘जुलै महिन्याचे धान्य आले आहे. हे धान्य एक नोव्हेंबरपासून वाटपास सुरुवात केली जाणार आहे.’ दरम्यान, प्राधान्य कुटुंब लाभार्थी गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना ३५ किलो धान्य हे दोन रुपये प्रति किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ स्वस्त धान्य दुकानांतून देण्यात येत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times