पाटणाः बिहारमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या ( ) पहिल्या टप्प्यात आज ७१ जागांवर मतदान होणार आहे. उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद होत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे जाहीर सभा घेणार आहेत. दरभंगा, पाटणा आणि मुजफ्फरपूर येथे पीएम मोदींच्या सभा होतील. त्याचवेळी, राहुल गांधी वाल्मीकी नगर (पश्चिम चंपारण) आणि कुशेश्वरस्थान (समस्तीपूर) येथे प्रचारसभा घेतली.

पंतप्रधान मोदींनी आज होणाऱ्या जाहीर सभापूर्वी ट्विट केलं. ‘मी पुन्हा एकदा बिहारच्या जनतेमध्ये असेल. दरभंगा, मुजफ्फरपूर आणि राजधानी पटना येथील जाहीर सभांमधून थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. आपण सर्वांनी निश्चितच या सभेत सहभागी व्हावं’, असं आवाहन मोदींनी ट्विटमधून केलंय.

१०६६ उमेदवारांचं भवितव्य ठरणार

पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या ७१ जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. यात २.१४ कोटींहून अधिक मतदार १०६६ उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. ईव्हीएममध्ये बुधवारी १०६६ जणांचं कैद होईल.

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींनी केला प्रचार

राहुल गांधी यांनी २३ ऑक्टोबरला दोन प्रचारसभा घेतल्या. सीमेवर चीनशी असलेला तणाव आणि लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात तीन जागांवर प्रचार केला. पंतप्रधान मोदींनी सासाराम, गया आणि भागलपूर येथे जाहीर सभांना संबोधित केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here