बिहार विधानसभा निवडणकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. बिहारच्या १६ राज्यांमधील ७१ जागांवर आज मतदान होत आहे. बिहारमध्ये प्रमुख लढत ही एनडीए विरुद्ध महागठबंधन यांच्याच होत आहे. करोना महासाथीच्या या संकटकाळात होत असलेल्या या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सर्व काळजी घेण्यात आली आहे. करोनाच्या गाइडलाइन्सचे पालन केले जात आहे. पाहुयात निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाचे लाइव्ह अपडेट्स…

Live अपडेट्स…

>> पाटणा जिल्ह्यातील १९०- पालीगंज विधानसभा मतदार संघात मेरा पचौना पंचायतच्या बूथ क्रमांक २३६ वर लोकांनी मतदानावर टाकला बहिष्कार

>> काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील बिहारच्या मतदारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

>> बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान सकाळी ८ वाजेपर्यंत २.५ टक्के इतके झाले.

>> बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. ‘पहले मतदान, फिर जलपान’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केले आहे. या वेळी त्यांनी करोनाची काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे.

>> बिहार विधानसभा निवडणकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता सुरुवात झाली आहे. बिहार राज्यात एकूण १६ राज्यांमधील ७१ जागांवर आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here