म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनाचा तिढा दिवाळीपूर्वी सोडविण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार यांनी मंगळवारी दिले, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अशक्य झाले आहे. याशिवाय वेतन कराराच्या तरतुदींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९पासून लागू झालेला वाढीव ५ टक्के महागाई भत्ता अद्याप एसटी कामगारांना लागू झालेला नाही. २०१८मध्ये लागू झालेला २ टक्के महागाई भत्ता व २०१९मध्ये लागू झालेल्या ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकीही एसटी कामगारांना मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन, राज्य सरकारने महामंडळाला आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन सादर केले. त्यावर एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत येत्या आठवड्यात परिवहन आणि अर्थ विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन पवारांनी दिल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here