लंडनमधील इम्पिरिअल कॉलेजच्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. या संशोधनात तीन लाख ६५ हजारांहून अधिकजणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या अॅण्टीबॉडी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती काही महिनेच असू शकते.
वाचा:
या संशोधनात सहभागी असणारे प्रा. वँडी बार्कले यांनी सांगितले की, हिवाळ्यात लोकांना बाधित करणारा करोनाच्या संसर्गाची सहा ते १२ महिन्यात पुन्हा लागण होऊ शकते. इम्पिरिअल कॉलेजचे संचालक पॉल इलियॉट यांनी सांगितले की, शरीरात अॅण्टीबॉडी असलेल्या व्यक्तींची संख्या कमी होत असल्याचे आम्हाला आढळून आले. तरुणांपेक्षा वृद्धांच्या शरीरात अॅण्टीबॉडी कमी होत असल्याचे दिसून आले.
वाचा:
दरम्यान, करोनाच्या उपचारासाठी भारत, अमेरिकेसह काही देशांमध्ये ब्लड प्लाझ्माचा वापर करण्यात येत आहे. नुकत्याच एका संशोधनात शास्त्रज्ञांनी ब्लड प्लाझ्माच्या प्रभावी काळमर्यादेचा शोध लावण्यास यश मिळवले आहे.
वाचा:
कॅनडातील क्युबेकमध्ये एका रक्तदान केंद्रातील हेमा-क्युबेकच्या संशोधन पथकाने म्हटले की, करोनाच्या आजाराला मात दिलेल्या व्यक्तींच्या शरीरातील ब्लड प्लाझ्मा हा तीन महिनेच प्रभावी असतो. त्यानंतर जर ब्लड प्लाझ्मा दिल्यास त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी करोनाला मात दिलेल्या एका रुग्ण्यांच्या गटातून प्लाझ्मा काढला होता. तीन महिन्यातच रक्तातील अॅण्टीबॉडी नष्ट झाले असल्याचे त्यांना आढळून आले. काही दिवसांपूर्वीचे हे संशोधन समोर आले होते.
संशोधकांनी सांगितले की, रक्ताच्या नमुन्यातून फक्त २१ दिवसातच अॅण्टीबॉडीज संख्या कमी झाली. संशोधकांनी सांगितले की, करोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरातून घेतलेला प्लाज्मा बाधित व्यक्तींना लवकर देणे आवश्यक आहे. जेणेकरून करोनाबाधित रुग्णाच्या शरीरात अॅण्टीबॉडी वेगाने विकसित होतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times