पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी ट्विट करत म्हटले, ‘बिहार विधानसभा निवडणुकीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सर्व मतदारांनी कोविडसंदर्भातील सर्व ती काळजी घेत लोकशाहीच्या या पर्वात भाग घ्यावा आणि शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्कचा वापर जरूर करा. लक्षात ठेवा, पहले मतदान, फिर जलपान’
आज बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी बिहारमध्ये सभा घेत आहेत. आज पंतप्रधान मोदी बिहारमधील दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटणा येथे सभा घेत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमधील १६ जिल्ह्यांमधील ७१ विधानसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात एकूण १ हजार ६६ उमेदवारांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात दोन कोटी १४ लाख ८४ हजार ७८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या १६ जिल्ह्यांमध्ये एकूण ३१ हजार ३८० मतदान केंद्रांवर ३१,३८०-३१,३८० सेट EVM आणि VVPAT ची व्यवस्था करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times