कमळाचं चित्र असलेला मास्क परिधान करत मंत्री प्रेम कुमार मतदान केंद्रावर दाखल झाले होते. ‘मास्क परिधान करणं आवश्यक होतं, म्हणून वापरलं होतं. ज्या मास्कचा आम्ही वापर करत होतो, त्याचाच वापर इथेही झाला. मतदान केंद्राच्या ठिकाणी दुसऱ्या मास्कची व्यवस्था नव्हती. त्यामुळे माझ्याजवळ जे मास्क होतं, तेच वापरून मी गेलो. प्रत्येकालाच माहीत आहे की मी कमळाच्या फुलाचा आहे, ही काही मोठी गोष्ट नाही. मी काही हे जाणून बुजून केलेलं नाही. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव मी हे मास्क परिधान केलं होतं’ असं स्पष्टीकरण वादानंतर प्रेम कुमार यांनी दिलंय.
उल्लेखनीय म्हणजे, सायकल चालवत मंत्री महोदय मतदानासाठी केंद्रावर दाखल झाले होते. यावेळीही त्यांनी हा मास्क परिधान केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक पायी चालत बुथवर दाखल झाले.
वाचा :
वाचा :
निवडणूक आयोगाच्या
दरम्यान, करोनाच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगानं दिशानिर्देश अगोदरपासूनच जारी केलेले आहेत. या निर्देशानुसार, करोना क्वारंटाईन मतदारांना शेवटच्या तासात मतदानाची सुविधा दिली जाईल. तसंच मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज यांचा वापर करणं आवश्यक असेल. मतदानासाठी एक तासाची वेळ वाढवून देण्यात आलीय. यंदा सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. या निवडणुकीसाठी ७ लाख हँड सॅनिटायझर, ४६ लाख हून अधिक मास्क, ६ लाक पीपीई कीटस, ७.६ लाख बोडशीट, २३ लाख हँड ग्लोव्ह्ज यांची तयारी करण्यात आलीय. या निवडणुकीत जवळपास ७ कोटींहून अधिक मतदार आपल्या अधिकाराचा वापर करणार आहेत.
साठी होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यातील ७१ मतदारसंघात मतदान समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघांचा तर तिसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांचा समावेश आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे १९ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.
वाचा :वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times