म. टा. प्रतिनिधी, : गुन्हे शाखेच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान दोन लाख रुपयांची एमडी पावडर जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस लाइन टाकळी परिसरात झाली हे विशेष.

अब्दुल करीम अजीज शेख उर्फ करीम लाल (वय ३१. रा. नागसेन सोसायटी, मानकापूर) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. करीम पोलिस लाइन टाकळी परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. ही माहिती पथकातील पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांना मिळाली. ते पथकासह तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळायला लागला. पाठलाग केल्यानंतर त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ५१ ग्रॅम अर्थात दोन लाख रुपयांची एमडी पावडर जप्त करण्यात आली. लालाचे मुंबई आणि गुजरात येथील नेटवर्कशी संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर आता शहरातील तसेच आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कारवाई अंमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते, सहायक पोलिस निरीक्षक विजय कासोधन, हवालदार राजेश देशमुख, प्रदीप पवार, समाधान गिते यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here