नवी दिल्लीः मोबाइलचे रिचार्ज प्लान गेल्या काही दिवसापासून महाग झाले आहेत. मोबाइल वापरणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे खर्च करावे लागत आहेत. जर मोबाइलमध्ये खूपच कमी वापरत असाल तर त्या ग्राहकांसाठी काही खास रिचार्ज प्लान आहेत. या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस सह काम चालवण्यापुरता मोबाइल डेटा मिळतो. रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या ग्राहकांना हे प्लान उपयुक्त ठरू शकतात.

एअरटेलच्या प्लानची सुरुवात १९ रुपयापासून होते. या प्लानमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानची वैधता २ दिवसांची आहे. प्लानमध्ये २०० एमबी डेटा मिळतो. १४९ आणि १७९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आहे. यात ग्राहकांना २ जीबी डेटा मिळतो. या दोन्ही प्लानमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंग मिळते. १४९ रुपयांच्या प्लानमध्ये ३०० एसएमएस तर १७९ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना २ लाखाचा लाइफ इश्यूंरेंन्स मिळतो. एअरटेलच्या ३७९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांनवा ८४ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये दुसऱ्या नेटवर्कवर फ्री कॉलिंगसह ६ जीबी डेटा मिळतो. तसेच ९०० एसएमएस मिळतो.

वर्षभर (३६५ दिवस) चालणारा एअरटेलचा प्लान १ हजार ४९८ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा मिळतो. दुसऱ्या नेटवर्कवर फ्री कॉलिंग करण्याची सुविधा आहे. प्लानमध्ये ग्राहकांना ३६०० एसएमएस दिले जातात. रिलायन्स जिओचा ९८ रुपयाचा प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात ग्राहकांना २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ अनिलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. १० रुपयांचा टॉप अप केल्यानंतर १२४ नॉन जिओ मिनिट मिळतात. जिओच्या १२९ रुपयाच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. ग्राहकांना २ जीबी डेटा, जिओ ते जिओ फ्री कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात. तसेच ३०० एसएमएस दिले जातात. ३२९ रुपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी डेटा, ८४ दिवसांची वैधता, जिओ ते जिओ फ्री कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट मिळतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here