मुंबईः मराठीची चीड येते, म्हणत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या गायक जान सानू विरोधात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हा वाद अधिक चिघळण्यापूर्वीच कलर्स वाहिनीनं सावध पावलं उचलतं दिलगिरी व्यक्त केली आहे. कलर्स वाहिनीनं झालेली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा बिग बॉसच्या १४व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या एका एपिसोडदरम्यान निक्की तांबोळीशी बोलताना मराठी भाषेची चीड येते, असं वक्तव्य केलं होतं. यामुळेच जाननं मराठी भाषेचा अपमान केला असल्याचं म्हणत शिवसैनिक न मनसेच्या कार्यकर्त्यांनी बिग बॉसविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. तसंच, जाननं मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी माफी मागावी अशी, मागणीही जोर धरु लागली आहे. हा वाद अधिक वाढण्याआधीच कलर्स वाहिनीकडून माफीनामा जारी करण्यात आला आहे. कलर्स वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत माफी मागीतली आहे.

कलर्स वाहिनीनं मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात, ‘बिग बॉसचा २७ ऑक्टोबरचा प्रसारित झालेल्या भागातून जान सानूनं केलेल्या वक्तव्यांचा तो भाग हटवण्यात येत आहे. आम्ही मराठी भाषिक व भारतातील सर्व भाषिक प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करतो,’ असं स्पष्टीकरण वाहिनीकडून देण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here