भारतीय संविधानात जनराज्यपाल असा उल्लेख आढळत नाही, तरीही, शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्वप्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबाबत धन्यवाद. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ, दीक्षांत समारंक्ष सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत, अशा शब्दात पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरुनही शरद पवारांनी या पत्रात भाष्य केलं आहे. निधर्म वादासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेली दखल याची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही, अशी आठवणच शरद पवारांनी राज्यपालांना करुन दिली आहे.
काय आहे हे प्रकरण
राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. राज्यपालांच्या या पत्रावरुन राजकारण तापलं होतं. शरद पवार यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला होता. राज्यपाल कोश्यारी यांचं पत्र संविधानाची चौकट मोडणारं असल्याचं परखड मत व्यक्त करतानाच धार्मिक स्थळे उघडली नाहीत म्हणून ‘सेक्युलर’ ठरवून अवहेलना करणार का? असा सवाल यांनी केला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times