मुंबईः करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाच पाऊलं उचललं आहे. सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव रेल्वेला देण्यात आला आहे. तसं, पत्रक आज सरकारकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आलं आहे.
मिशिग बिगीन अंतर्गंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवशाची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर सर्व महिला, वकिल यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा कधी देणार असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर राज्य सरकारला तोडगा काढण्यात अखेर यश आलं आहे. राज्य सरकारने रेल्वेला पाठवलेल्या पत्रकात ठराविक वेळेनुसार लोकल प्रवेश देण्याची मागणी केली आहे. तसंच, गर्दीच्या वेळी अधिक लोकल सोडण्यात यावा, असंही पत्रात नमूद केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times