नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: इराणी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, अशांनी कृपया लवकरात लवकर आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहनही इराणी यांनी ट्विटद्वारे केले आहे.

जेव्हा मला काही घोषणा करायची असते तेव्हा मला शब्द शोधा लागतात आणि हे कधी कधी होते. म्हणून मी सोपे शब्द वापरते. मला करोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी नक्कीच तपासणी करून घ्या, असे इराणी म्हणाल्या.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या बिहार निवडणुकीच्या प्रचारातील भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत. त्या मोठ्या उत्साहाने बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करत होत्या. मात्र, त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांना प्रचारापासून दूर राहावे लागणार आहे. बिहारमधील उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मृती इराणी यांनी मंगळवारी गोपालगंज येथे एका सभेला संबोधित केले होते. या सभेत त्यांनी राष्ट्रीय जनता दलावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here