मुंबईः करोना मृतांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यानं महाराष्ट्रातील करोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. आज ९१ करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तर, आरोग्य प्रशासनाला करोना मृतांची संख्या रोखण्यात यश येत असल्याचं चित्र आहे. ()

राज्यात गेल्या सात महिन्यांपासून करोना संसर्गानं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र, करोनाचा संसर्ग रोखण्यात आरोग्य प्रशासन व सरकारला यश येत असल्याचं दिसत आहे. आजही गेल्या काही महिन्यांपासून तीन आकडी असलेली करोना मृतांची संख्या आता दोन आकड्यांवर थोपवण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. आज ९१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदरात १ टक्क्यांनं घट होऊन २. ६२ टक्के इतका झाला आहे. राज्यात एकूण करोना मृतांचा आकडा ४३ हजार ५५४वर पोहोचला आहे.

करोना मृतांबरोबरच नवीन करोना रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे. आजही नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज तब्बल ८ हजार ४३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १४ लाख ८६ हजार ९२६इतकी झाली आहे. तर, रिकव्हरी रेटही ८९. ५३ टक्के इतका झाला आहे.

आज राज्यात ६ हजार ७३८ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, सध्या विविध रुग्णालयांत १ लाख २९ हजार ७२४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ६८ हजार ८७९ चाचण्यांपैकी १६ लाख ६० हजार ७६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ५४४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, १२ हजार ९८८ व्यक्ती संस्थात्मक व्यक्ती क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here