मुंबई: सणानिमित्त प्रवासी गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन महामंडळाने दि. ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असून, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. ( declared in )

वाचा:

दिवाळीत एसटी प्रवास सुलभ आणि सुसह्य व्हावा यासाठी एसटी महामंडळाने जादा फेऱ्यांचे नियोजन केले असून याबाबत परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. यांनी तपशीलवार माहिती दिली आहे. आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही महामंडळातर्फे त्यांनी केले आहे.

वाचा:

एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. त्यानुसार यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यकत्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देशही त्यासोबत स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले गेले आहेत. या बाबतीत प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगाराला दिल्या आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here