वाचा:
एका प्रकरणातच अटक केलेला हा कळंबा कारागृहात होता. तेथे त्याची ओळख आणि यांच्याशी झाली. या दोघांवर खून आणि यशवंत बँकेवर दरोडा घातल्याचा गुन्हा होता. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ‘मोठा हात मारू आणि चैनीत राहू’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार जामिनावर बाहेर येताच त्यांनी ‘मोठा हात’ म्हणून थेट ट्रॅक्टरलाच हात घातला. बिद्री साखर कारखान्यात ऊस घालून परत येत असलेल्या एका ट्रॅक्टरचालकास अडवून त्याला मारहाण केली. मोबाइल, दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर घेऊन ते फरार झाले. मार्च महिन्यात ही घटना घडली होती.
वाचा:
राजाराम माने हा मूळचा सांगली जिल्ह्यातील जत येथील आहे. शंतनुकुमार खंदारे आणि विजय पाटील या आणखी दोन मित्रांच्या मदतीने त्यांनी हा टॅक्टर जतला पळवला. त्याचा नंबर आणि रंग बदलून कर्नाटकात त्याचा ते वापर करत होते. आठ महिन्यानंतर कोल्हापूर पोलिसांना त्याचा सुगावा लागला. त्यांनी सापळा रचून आरोपींना बेड्या घातल्या. त्यांच्याकडून ट्रॉली आणि ट्रॅक्टर असा पाच लाखाचा माल जप्त केला आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हा तपास पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली झाला.
दुचाकीचोरांना अटक
लॉकडाऊनच्या काळात दुचाकी चोरून ते विकत चैन करणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी पकडले. यातील तुळशीदास पाटील हा पदवीधर आहे. अवधूत धुरे हा वाहन चोरून आणल्यानंतर तुळशीदास त्याची विक्री करायचा. या दोघांना पकडून त्यांच्याकडून पंधरा मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times