पाषाणकर बुधवारी सायंकाळी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांची ‘सुइसाइड नोट’ समोर आली. यात व्यवसायातील आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. पाषाणकर बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडून, लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर त्यांनी एक बंद लिफाफा चालकाकडे देऊन तो घरी देण्यास सांगितले. त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यांचा माग काढला जात आहे. शहरातील हॉटेलमध्येही त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू
शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या तपासासाठी मॉडेल कॉलनी आणि परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले; पण त्याचा उपयोग होऊ शकला नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव! कायदा-सुव्यवस्था राखणे आणि तपासकामात अधिक प्रभावी ठरण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी सीईओ यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती त्यांनी ट्टिवरद्वारे दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times