दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून, ४० जागा स्वबळावर लढण्याची रणनीती आखली जात आहे. त्यासाठी राज्यातील एका ज्येष्ठ मंत्र्यांची गोव्यासाठी नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. यांनी बुधवारी दिली.
गोव्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या राष्ट्रवादीचा इरादा आहे. काँग्रेस आणि भाजप या पक्षांना समर्थ राजकीय पर्याय देऊ असे सांगून काँग्रेससोबत संभाव्य आघाडीची शक्यता पटेल यांनी फेटाळून लावली आहे. तेथे समविचारी पक्षांच्या साथीने गोव्यात पुढील सरकार स्थापन करू शकेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. पुढील दीड वर्ष आम्ही मेहनत घेऊ. महाराष्ट्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारी करू, असे पटेल यांनी सांगितले. येत्या २२ नोव्हेंबरला पणजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय सुरू होणार आहे असे ते म्हणाले. पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात विश्वासार्ह आणि पर्यायी नेतृत्व देईल, असा दावा त्यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times