प्रणब धल सामंत आणि बोधिसत्व गांगुली

नवी दिल्ली : ‘ लागू करणे आणि उठवणे या दोन्ही गोष्टी आमच्या सरकारने योग्य वेळी केल्या. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले,’ असा दावा यांनी ”ला दिलेल्या खास मुलाखतीत केला. ‘करोनाशी पद्धतशीरपणे लढा देत आहोत. नियोजन करतानाच, साथीची तीव्रता पाहून प्रतिसाद वाढविला. साथ नियंत्रण करताना संपूर्ण समाजाचा विचार केला. वेगाने दिलेल्या प्रतिसादामुळे भारतात करोनाचा सर्वदूर प्रसार झाला नाही आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले असे पाहणीतून स्पष्ट झाले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

करोना रोखण्यासाठी सरकारने अवलंबलेल्या धोरणाच्या विरोधात होत असलेल्या टीकेचा समाचार पंतप्रधानांनी घेतला. सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट करताना मोदी म्हणाले, की उद्योगांना सवलती देण्याची मागणी अनेक तज्ज्ञ आणि वृत्तपत्रे करीत असतानाही आमचा भर असुरक्षित लोकांचे जीव वाचविण्यावर होता. ‘लोकांचे प्राण वाचविण्यावर आम्ही भर दिला. मार्च महिन्यातच तज्ज्ञांनी करोनाच्या रुग्णांच्या प्रचंड मोठ्या संख्येचे भाकीत केले होते. आता सध्याची रुग्णसंख्या पाहा. सरकारला दोष देता यावा यासाठी, करोनाविरुद्ध लोकांनी जो लढा दिला त्यांना श्रेय देण्याचे टीकाकार नाकारत आहेत.’

दुर्लक्षित घटकांना अल्पावधीत मदत पोचविताना कल्याणकारी वितरण यंत्रणा परिणामकारक ठरत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘यापूर्वी अगदी छोट्या स्वरूपातील नैसर्गिक आपत्तीतही गरिबांपर्यंत मदत पोचत नव्हती आणि त्यातही मोठा होत होता. मात्र, आता आम्हाला अल्पावधीतच प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांना भ्रष्टाचाराची एकही तक्रार न येता मदत पुरविणे शक्य झाले आहे.’

वाचा : वाचा :

केंद्र असंवेदनशील नाही

वस्तू आणि सेवा करातील () राज्यांना द्यावयाच्या परताव्यावरही मोदी यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘जीएसटीबाबत एकमत झाले असताना केंद्र सरकार राज्यांप्रति असंवेदनशील असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. संयुक्त पुरोगामी सरकारच्या (यूपीए) काळात मूल्यवर्धित कराला (व्हॅट) केंद्रीय विक्री करात आणण्यात आले. आल्यास भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी राज्यांना दिले. मात्र, यूपीएने काय केले ते माहीत आहे? आश्वासन देऊनही त्यांनी राज्यांना भरपाई देण्यास नकार दिला. एक वर्ष नाही; तर सलग पाच वर्षे त्यांनी भरपाई दिली नाही. त्यामुळेच यूपीएच्या काळात राज्ये जीएसटीला तयार झाली नव्हती. २०१४ साली आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ही थकबाकी पूर्ण केली. संघराज्याबाबत हा आमचा दृष्टिकोन आहे.’

वाद श्रेयाचा

कृषी कायद्याला होत असलेल्या विरोधावर पंतप्रधान मोदी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘अशा प्रकारच्या सुधारणांचा आग्रह तज्ज्ञांनी फार पूर्वीपासून धरला होता. त्यानुसार आता आमच्या सरकारने कृषी कायदा केला आहे. त्याचे श्रेय आम्हाला मिळू नये अशी विरोधी पक्षांची भावना आहे.’ आर्थिक क्षेत्रात ज्या सवलती जाहीर झाल्या आहेत, त्यावर मोदी म्हणाले की, सूक्ष्म अर्थव्यवस्था स्थिर राहील यादृष्टीने देण्यासाठी आमचे सरकार वेळोवेळी टप्प्याटप्याने आवश्यक ती सर्व पावले टाकेल.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here