अय्याज सादिक यांनी संसदेत म्हटले की, कुलभूषण जाधवसाठी आम्ही अध्यादेश आणला नाही. सरकारने हा अध्यादेश दोन-तीन महिने लपवून ठेवला. कुलभूषण प्रकरणात हे सरकार झुकत असल्याचे चित्र आहे. यावेळी अभिनंदन वर्धमान यांच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. अभिनंदनच्या मुद्यावर असलेल्या बैठकीत पंतप्रधान इम्रान खान यांनी येण्यास नकार दिला. तर, परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी हे थरथर कापत होते. त्यांच्या डोक्यावर घाम होता. त्यांनी या बैठकीत सांगितले की, अभिनंदनला सोडण्यासाठी मान्यता द्या, अन्यथा रात्री ९ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे.
वाचा:
वाचा:
वाचा:
अय्याज यांनी सांगितले की, भारत पाकिस्तानवर हल्ला करणार नव्हता. सरकारला गुडघे टेकवण्यास भाग पाडणे हे भारताचे उद्दिष्ट होते आणि ते साध्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी भारताच्या हवाई दलाने बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानचे काही लढाऊ विमाने भारताच्या दिशेने आले होते. त्यांना पिटाळून लावण्यासाठी अभिनंदन यांनी इतर सहकाऱ्यांसह मिग-२१ विमानाने उड्डाण घेतले होते.
वाचा:
विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यावेळी स्थानिकांच्या मदतीने पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ प्रसारीत करून पाकिस्तानने आपली चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अभिनंदन यांना एक मार्च रोजी अटारी-वाघा सीमेवरून भारतात पाठवण्यात आले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times