लखनऊ : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये रेल्वे रुग्णालयांच्या शौचालयांना रंगवण्यात आल्यानंतर एक नवा वाद समोर आलाय. हा वाद निर्माण झालाय त्याचं कारण म्हणजे, शौचालयाच्या भिंतींना समाजवादी पक्षाच्या झेंड्याच्या रंगाप्रमाणे लाल आणि हिरव्या रंगात रंगवण्यात आलंय. समाजवादी पक्षाकडून या गोष्टीला तीव्र आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. लवकरात लवकर ही चूक सुधारली जावी, अशी मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आलीय.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर स्थित ललित नारायण मिश्र रेल्वे रुग्णालयाचं शौचालयातील टाईल्सच्या रंगावरून हा वाद निर्माण झाला आहे. सरकारकडून जाणून-बुजून या रंगाच्या टाईल्स वापरण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.

गुरुवारी समाजवादी पक्षाकडून ट्विट करून याबद्दल आक्षेप व्यक्त करण्यात आला. ‘दूषित विचार असणाऱ्या सत्ताधीशांद्वारे राजकीय द्वेषामुळे गोरखपूर रेल्वे रुग्णालयाच्या शौचालयाच्या भिंतींना सपाच्या रंगात रंगवणं लोकशाहीला काळिमा फासणारी निंदणीय घटना आहे’ असं ट्विट समाजवादी पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आलं आहे.

वाचा : वाचा :

या सरकारी कामादरम्यान रुग्णालयाच्या शौचालयांना लाल आणि हिरव्या रंगाच्या टाईल्स लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर समाजवादी पक्षानं भाजपची कठोर शब्दांत निंदा केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, ललित नारायण मिश्र रुग्णालयाचं संचालन रेल्वेकडून केलं जातं. या रुग्णालयात नुकतंच शौचालयांच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात (BJP) किंवा सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. राज्यात लवकरच राज्यसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत राहणार हे नक्की!

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here