चोरट्यांनी कायस्थ यांच्याकडील २ लाख ७० हजार रोख, गळ्यातील ५ तोळ्यांची २ लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन, दहा हजार रुपयांचा मोबाइल फोन असा एकूण ४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला. हे तीन चोरटे मोटारसायकलवर आले आणि त्यांनी कायस्थ यांना तलवारीचा धाक दाखवला. त्यांची तोंडे काळ्या कपड्यांनी बांधलेली होती. या चोरट्यांनी त्यांना मारहाण देखील केली अशी फिर्याद कायस्थ यांनी पोलिसांत दिली आहे.
व्यावसायिकाकडे मागितली खंडणी
सिडको : व्यावसायिकाकडून पाच हजार रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश दिलीप भिंगारे (वय ३५, रा. औदुंबर स्टॉपजवळ) यांचे महाराणा प्रताप चौक येथे सार्थक अंडा रोल या नावाने दुकान आहे. याठिकाणी संशयित गणेश नंदू आहेर (वय २४, रा. माताजी चौक) व निखिल सुभाष लाड (वय २१, रा. महाकाली चौक) हे दोघे गेले. त्यांनी भिंगारे यांच्याकडून पाच हजार रुपयांची मागणी करून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच भिंगारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
दीड वर्षांपासून फरार होते, पोलिसांनी केली अटक
: अंबडमध्ये आठ घरफोड्या करून पोलिसांची डोकेदुखी वाढविणाऱ्या आणि दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोन संशयितांना शहर पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथून अटक केली. त्यांच्याकडून सोन्याची लगड व मोबाइल जप्त करण्यात आला आहे. संपत दगडू गायकवाड (वय २५, रा. जाधव संकुल, घुलेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) आणि सुकदेव अंकुश गायकवाड (वय २६, रा. पळसे, नाशिकरोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. १५ मे २०१९ रोजी कुटुंबीय घराच्या टेरेसवर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातून सोन्याची पोत व मोबाइल हिसकावून नेला होता. एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times