सांगली: ‘मुख्यमंत्री यांना भेटून काय उपयोग? सध्या हेच राज्य चालवतात. त्यामुळं त्यांनाच भेटलं पाहिजे. शिवाय, मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल आणि शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात,’ अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज केली.

ते सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पवारच सध्या सरकार चालवतात. त्यामुळं एखाद्या प्रश्नासाठी पवारांनाच भेटलं पाहिजे,’ असं पाटील म्हणाले.

वाचा:

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेतील काही नेत्यांनी त्यांना ऑफरही दिली होती. पंकजा यांनी दसरा मेळाव्याच्या सभेत भूमिका स्पष्ट केली असली तरी चर्चा सुरूच आहेत. त्यातच पंकजा यांनी नुकतंच शरद पवारांचं कौतुक केलं होतं. त्यामुळं उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. चंद्रकांत पाटील यांना त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. मात्र, शरद पवार बाहेर पडतात याचं कौतुक आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जयंत पाटील यांनीही सांगलीत भाजपच्या नेत्यांचे कौतुक केले आहे.’

वाचा:

मनसे अध्यक्ष यांनी वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी कोश्यारी यांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याबाबत विचारलं असता, ‘माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आलेले नाही. त्यामुळं राज्यपालांनी राज यांना दिलेला सल्ला योग्यच आहे,’ असं पाटील म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here