पुणे: नोकरीच्या शोधात असलेल्या पुण्यातील ४० वर्षीय आयटी इंजिनीअरला २० लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ठकबाजांनी त्याची केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, माधव केंजळे (वय ४०) असे आयटी इंजिनीअरचे नाव आहे. ते कोथरूडमध्ये राहतात. नोकरीचे प्रलोभन देऊन सायबर चोरट्यांनी २० लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

तक्रारीनुसार, केंजळे यांनी विविध वेबसाइटवर त्यांचा बायोडेटा अपलोड केला होता. ते चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात होते. सायबर चोरांनी वेबसाइटवरून त्यांचा बायोडाटा मिळवला. त्यानंतर त्यांच्याशी मोबाइलवर अनेकदा संपर्क साधला. त्यांनी इमेल देखील केले. त्यानंतर केंजळे यांना चांगला पगार असलेली नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी विविध कारणे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून २० लाख ६४ हजार ७७७ रुपये उकळले. हा सगळा प्रकार जून २०१९ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत घडला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here